पेट्रोल-डिझेलचा भडका; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर धर्मेंद्र प्रधान यांनी फोडले खापर


भुवनेश्वर – नागरिकांना इंधनाच्या वाढत्या किंमतींनी उच्चांक गाठल्याने फटका बसला असून इंधनाच्या वाढत्या किंमतीचे खापर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘ओपेक’ राष्ट्रात तेलाचे खालावलेले उत्पादन आणि क्रूड ऑईलच्या वाढत्या किंमती यांच्यावर फोडले आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींनी उच्चांक गाठला असून इंधनाची दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झाल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दरही भडकले आहेत. पेट्रोलसाठी मुंबईत ८४.०७ रुपये आणि डिझेलसाठी ७१.९४ रुपये एवढा दर प्रतिलिटर मोजावा लागत आहे. इंधनाच्या वाढत्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. पण तेलाच्या किंमती ठरविणे सरकारच्या हातामध्ये नाही. ‘ओपेक’ राष्ट्रात मागणीचे तुलनेत तेलाचे उत्पादन खालावले असल्याचे प्रधान म्हणाले.

Leave a Comment