लाँच होतोय इन्फिनिटी स्क्रीनचा गॅलॅक्सि जे ६


दक्षिण कोरियन जायंट टेक कंपनी सॅमसंग मुंबईत होत असलेल्या एका कार्यक्रमात आज नवा गॅलॅक्सि जे ६ स्मार्टफोन लाँच करत असून ग्राहकांना तो उद्यापासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमात कंपनी जे ६ बरोबर जे ४ आणि ए सिरीजमधले ए ६ आणि ६+ सादर करणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र कंपनीने फक्त जे ६ ची घोषणा केली होती.

फोनचा टीझर यापूर्वीच सादर झाला आहे. त्यात हा फोन अतिशय पातळ आणि स्लिम दिसतो आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत कंपनीने बेजललेस स्क्रीन फ्लॅगशिप फोन साठी दिला होता मात्र आता तो मिड रेंज फोन जे ६ साठीही दिला गेला आहे. इन्फिनिटी स्क्रीन असे या स्क्रीनचे वर्णन केले गेले आहे.

जे ६ साठी ५.६ इंची एचडी अमोलेड इन्फिनिटी डिस्प्ले, २,३,४ जीबी रॅम ऑप्शन, डूअल सीम, ३२ आणि ६४ जीबी स्टोरेज, १३ एमपीचा रिअर आणि ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा असून जे सिरीज मधले फोन १५ ते २० हजारच्या रेंजमध्ये असतील असा अंदाज आहे.

Leave a Comment