टिपू सुलतानाचा ऐतिहासिक शंख प्रदर्शनात


युद्धाची सुरवात आणि विजयानंतर टिपू सुलतान शंखनाद करत असे तो १८ व्या शतकातला दुर्मिळ शंख सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी प्रदर्शनात ठेवला गेला आहे. २० मे रोजी देशभर साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या निमित्ताने काशीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या संग्रहालयात हा शंख जतन केला गेला आहे.

भारत कला भवनात असलेल्या या शंखाविषयी सांगताना प्रो. ए.के. सिंग म्हणाले पूर्वी युद्धात शंखनाद करण्याची प्रथा होती. त्यावेळी युद्धाचे नियम होते. त्यानुसार युद्ध सुरु होण्यापूर्वी शंखनाद केला जाई आणि सूर्यास्त झाला कि युद्ध थांबत असे. युद्धात विजयी होणारा पक्ष शंखनाद करत असे. टिपू सुल्तानही युद्ध सुरु करताना आणि विजय मिळविल्यावर शंखनाद करत असे. हा शंख १५ इंच लांब आणि १० इंच उंच आहे. हा अतिशय दुर्मिळ असून त्याची किंमत करोडोमध्ये होईल.

१९२० साली प्रथम या कलाभवनाची पायाभरणी भारत कला परिषद म्हणून केली गेली होती. मात्र १९६२ मध्ये या कलाभवनाचा शिलान्यास तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू याच्या हस्ते झाला. या भवनात अनेक दुर्मिळ वस्तू जतन केल्या गेल्या असून त्यांची संख्या लाखाहून अधिक आहे.

Leave a Comment