कर आकारणीत भारताचे अमेरिकेला सडेतोड उत्तर


अमेरिकेने भारतातील स्टील आणि अल्युमिनियम उत्पादनावर २० ते १०० टक्के जादा कर आकारणी केली जाणार असल्याची घोषणा केल्यावर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने अमेरिकेतील २० वस्तूंवर १०० टक्के कर आकारणी केली जाईल असे जागतिक व्यापार संघटनेला कळविले आहे. अमेरिकेने जर कर आकारणी रद्द केली नाही तर त्यामुळे भारताला जे नुकसान सोसावे लागेल त्याची भरपाई अमेरिकन वस्तूंवर १०० टक्के कर लावून केली जाईल असा इशारा भारताने दिला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार ९ मार्च रोजी अमेरिकेने स्टीलवर २५ टक्के तर अल्युमिनियमवर १० टक्के अतिरिक्त कर आकाराला जाईल अशी घोषणा केली होती. याची अंमलबजावणी २१ जून २०१८ पासून केली जाणार आहे. भारताने अमेरिकेने हि घोषणा करण्यापूर्वी कोणतीही चर्चा न केल्याचे कारण देताना भारत अमेरिकेतून येणाऱ्या सफरचंद, चॉकलेट, गोल्फ कार, ८०० सीसी पेक्षा अधिक इंजिन क्षमतेच्या मोटारसायकल, मटार, अक्रोड, सोयाबीन तेल, पामोलीन तेल, कोको या सारख्या २० वस्तूंवर १०० टक्के कर द्यावा लागेल असे स्पष्ट केले आहे. अमेरिकेने स्टीलवर लादलेल्या जादा करामुळे भारताला १३.४ दशलक्ष तर अल्युमिनियमवरील करामुळे ३१.१६ दशलक्ष बोजा सहन करावा लागेल हि रक्कम अमेरिकेतून येणाऱ्या मालावर कर लादून त्यातून भरून काढली जाणार आहे.

Leave a Comment