कर्नाटकी नाट्यावर अखेर पडदा


बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीच्या आधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्यापूर्वी भावनिक भाषण केले.

येड़ियुरप्पा यांनी यावेळी आपण राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले. त्याचबरोबर त्यांनी यावेळी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानले आहेत, आम्ही नंबर वनचा पक्ष म्हणून पुढे आलो. आम्हाला यश सिद्धरामय्या यांच्या अपयशामुळे मिळाल्याचे येडियुरप्पा यांनी आपल्या भाषणात सांगितले. आपल्या भाषणात येडियुरप्पा अतिशय भावूक झाले होते. आम्ही कमी आकड्यावरून कसे वाढत गेलो, असेही येडियुरप्पा यांनी आपल्या भाषणात सांगितलं. येडियुरप्पा भाषण करताना संतापलेले तर होतेच, पण भावूकही दिसत होते.