भारतात डिसेंबर २०१९ पर्यंत येऊ शकते ५जी सेवा


मुंबई : येत्या काही दिवसात ५ जीचे निकष निश्चित करण्याचा ट्रायचा प्रयत्न असून जर तसे झाले तर भारतात डिसेंबर २०१९ पर्यंत ५ जी सेवा सुरु होऊ शकते. ही शक्यता मुंबईत झालेल्या ५ जीच्या प्रदर्शनात वर्तवण्यात आली आहे. ५ जीचा डाउनलोड स्पीड ४ जीच्या तुलनेत किमान २० पट ठेवण्याची अट ट्राय ठेवू शकते.

दैनंदिन जीवनात ५जीमुळे कोणते बदल होतील, याचे प्रेझेंटेशन मुंबईतल्या हॉटेल लिलामध्ये झाले. यात नोकीया, इन्टेल, सॅमसंग, जीओ आणि बीएसएनएल या सारख्या दिग्गज कंपन्यांनी उत्पादनांचे सादरीकरण केले गेले. ५ जी हे शहरी आणि ग्रामीण वाहतुकीच्या समस्येवर चांगले सोल्युशन असू शकेल, असा विश्वास नोकियाचे भारतातील विपणन प्रमुख अमितकुमार मारवा यांनी यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment