येतोय ४ हजार जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन


स्मार्टफोन खरेदी करताना युजर ज्या बाबी महत्वाच्या मानतो त्यात फोनची इंटरनल मेमरी किती याला अधिक प्राधान्य दिले जाते. युजर फोटो, व्हिडीओ, मुव्हीज असे अनेक प्रकार स्वतःच्या फोन मध्ये साठवून ठेवतो आणि त्यासाठी मेमरी जास्त असणे गरजेचे असते. युजरची हि गरज लक्षात घेऊन लेनोवो या नामवंत कंपनीने झेड ५ नावाने तब्बल ४ हजार जीबी म्हणजे ४ टीबी मेमरीचा फोन बाजारात आणण्याची तयारी केली आहे. हा फोन १४ जून रोजी लाँच केला जाणार आहे.

लेनोवोचे उपाध्यक्ष चांग चेन यांनी चीनी सोशल वेबसाईट विबो वर त्यांचा पुढचा फ्लॅगशिप फोन ४ टीबी स्टोरेज अश येत असल्याचे सांगितले आहे. या फोनमध्ये युजर २ हजार एचडी मुव्हीज, दीड लाख म्युझिक फाईल्स असेच १० लाखापेक्षा जास्त फोटो साठविता येणार आहेत. या फोनचे दुसरे महत्वाचे फिचर आहे त्याचा स्क्रीन. या स्क्रीनसाठी ९५ टक्के स्क्रीन बॉडी रेशो दिला जात आहे आणि १८ प्रकारची पेटंट घेतली गेली आहेत. फोनमध्ये रिअर साईडला इलेक्ट्रिक ब्यू बॉडी दिसते आहे.

लेनोवोची भारताच्या स्मार्टफोन बाजारातील कामगिरी फारशी उत्साहवर्धक नाही. त्यांनी २०१७मध्ये के ८ फोन भारतीय बाजारात आणला होता त्यानंतर त्यांचा नवा फोन आलेला नाही. झेड ५ च्या रूपाने कंपनी पुन्हा भारतीय बाजारात उतरेल असे समजते.

Leave a Comment