आला पहिला १ हजार जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन


स्मार्टफोन उत्पादक कंपन्यात फारश्या प्रसिद्ध नसलेल्या स्मार्टीसन कंपनीने चीनमध्ये १ टीबी म्हणजे १ हजार जीबी इंटर्नल स्टोरेज असलेला स्मार्टफोन स्मार्टीसन आर वन नावाने सादर केला आहे. चार व्हेरीयंट मध्ये आलेल्या या फोनचे डिझाईन सामान्य वाटले तरी त्याची फीचर्स मात्र लाजबाब आहेत. हा फोन चीनमध्ये वर्कस्टेशन सह लाँच केला गेला आहे.

हा फोन डूअल सीमसह असून तो ६ आणि ८ जीबी रॅम मध्ये ६४,१२८, आणि १ टीबी स्टोरेज अश्या प्रकारात आहे. अँड्राईड ओएस, ६.१७ इंची प्रेशर सेन्सिटिव्ह डिस्प्ले, गोरिला ग्लास प्रोटेक्शन, डूअल कॅमेरा त्यात २० आणि १२ एमपीचे रिअर आणि २४ एमपीचा फ्रंट कॅमेरा याचा समावेश आहे. फोनला क्विकचार्जिंगला सपोर्ट करणारी ३६०० एएमएच बॅटरी दिली गेली असून काळा आणि पांढरा अश्या दोन रंगात फोन उपलब्ध आहे. ८ जीबी रॅम आणि १ टीबी मेमरीच्या व्हेरीयंट ची किंमत आहे ९४,४०० रुपये.

Leave a Comment