दिल्लीत बनतेय वर्ल्ड ट्रेड सेंटर


भारताची राजधानी दिल्ली येथे न्यूयॉर्कच्या धर्तीवर वर्ल्ड ट्रेड सेंटर उभारले जात असून त्याचे बांधकाम सुरु झाले आहे. गुरुवारी उपराष्ट्रपती वैकाय्या नायडू याच्या हस्ते येथे भूमिपूजन पार पडले. २ वर्षात हे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. या सेंटरला न्यूयॉर्क वर्ल्ड ट्रेड सेंटर असोसिअशनने परवानगी दिली आहे असेही सांगितले जात आहे.

दिल्लीच्या स्मार्टसिटी अंतर्गत समावेश झालेल्या सरोजिनीनगर, नौरोजीनगर या पॉश भागात हे सेंटर उभारले जात असून त्यात २५ एकर जागेत १२ मजली इमारती उभारल्या जाणार आहेत. ८ हजार गाड्या पार्किंग त्यात समाविष्ट आहे. यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही असे सांगितले जात आहे. या बांधकामासाठी १४०० कोटी किमतीच्या जमिनीची विक्री झाली आहे असेही समजते.

Leave a Comment