कुल्लू जवळची नितांतसुंदर तीर्थन घाटी


हिमाचल प्रदेश देवभूमी म्हणून जगप्रसिध्द आहे. याच राज्यातील कुल्लू जवळ समुद्रसपाटीपासून १६०० मीटर उंचावर असलेली तीर्थन घाटी हे अतिशय शांत, सुंदर असे पर्यटन स्थळ आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी अजूनतरी पर्यटकांची खूप वर्दळ नाही त्यामुळे शांतता आणि निसर्गसौदर्य याची खास आवड असलेल्या पर्यटकांना हि जागा मोहून टाकेल यात संशय नाही.


घनदाट हिरवीगार जंगले, सफरचंदाच्या बागा, शांत रम्य वातावरण आणि साहसी पर्यटनाच्या अनेक संधी येथे आहेत. हिमालयन नॅशनल पार्कची सफर हा येथे येणाऱ्याना जणू बोनसच. रॉक क्लायंबिंग, ह्याकिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग, बॉनफायर, ट्राऊट मासे फिशिंग, फोटोग्राफी असे अनेक छंद पर्यटक येथे अनुभवू शकतात. मार्च ते ऑक्टोबर हा काळ येथे भेट देण्यासाठी उत्तम. दिल्लीपासून ५०६ किमी असलेल्या या ठिकाणी येण्यासाठी रेल्वेने चंदिगढ आणि तिथून टॅकसी घेता येते.

Leave a Comment