हर्ले डेव्हिडसनची रेकॉर्डब्रेक महागडी बाईक


जगात बाईक प्रेमींची संख्या कमी नाही पण त्यातही आपली बाईक हटके असावी अशी इच्छा असणारे बाईकवेडे अनेक आहेत. खास अश्या ग्राहकांसाठी हर्ले डेव्हिडसनने एक कस्टमाइज बाईक सादर केली आहे. अतिशय आकर्षक डिझाईन असलेल्या या खास ब्ल्यू एडिशन बाईक साठी फक्त १२.२ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

या बाईकसाठी हर्लेने स्विस वॉच आणि ज्युवेलरी कंपनी बुकररसह हातमिळवणी केली आहे. या बाईकवर हिरे जडविले गेले असून २ कंपन्यातील ८ लोक, स्विस क्राफ्टमन, जर्मन मोटारबाईक डिझायनर २५०० तास काम करत होते. बाईकचे डिझाईन रॉयल आणि नजर ठरणार नाही असे आहे. हि बाईक ज्युरिकमध्ये अनव्हील केली गेली. बाईकचे वेल्डिंग पासून पॉलीश पर्यंतचे बहुतेक काम हँडमेड आहे. व्हील्स रीम्स कस्टममेड आहेत. रीझर्वायर कॅप, हेडलाईट कव्हर, फुट कंट्रोल साठी गोल्ड ट्रीटमेंट दिली गेली आहे.


बाईकचा प्रत्येक भाग चांदी प्लेटिंगचा असून त्यानंतर वेगवेगळे सहा कोट देऊन त्यातून गडदनिळा रंग आणला गेला आहे. टॉप फ्युल टँक दोन कटआउट मध्ये असून डाव्या भागावर सॉलीटेअर रिंग ५.४० कॅरेट हिऱ्यात केली गेली आहे. याला डीझलर असे नाव आहे. तर दुसऱ्या भागात कस्टममेड घड्याळ आहे. बार एंडवर हि डीझलर रिंग असून हि बाईक खरेदी करणाऱ्या ग्राहकाला बुकेरर रिस्ट वॉच भेट दिले जाणार आहे.

Leave a Comment