जिओपेक्षाही दुप्पट स्पीड देणार एअरटेल


टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी अनलिमिटेड इंटरनेटची ऑफर आणली असून ही ऑफर एअरटेलच्या प्रीपेड युजर्ससाठी असणार आहे. कंपनी यासाठी अतिरिक्त पैसैही आकारणार नाही. या ऑफरमध्ये रोजचे इंटरनेट लिमिट संपल्यानंतर आता इंटरनेट बंद होणार नाही तर इंटरनेटचा स्पीड फक्त कमी होऊन १२८Kbps होईल.

१९९ किंवा त्यापेक्षा जास्तीचे रिचार्ज करणाऱ्यांसाठी ही ऑफर असणार आहे. अशाप्रकारची सेवा एअरटेलच्या आधीपासून रिलायन्स जिओ देत आहे. पण एअरटेलपेक्षा जिओचा इंटरनेट स्पीड दुपटीने कमी आहे. कारण दिवसाचं लिमिट संपल्यावर जिओचा स्पीड केवळ ६४Kbps मिळतो.

ग्राहकांना १९९च्या या प्लॅनमध्ये रोजच्या वापरासाठी १.४जीबी हायस्पीड इंटरनेट दिले जाते. याशिवाय यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जाते. तसेच रोज १०० एसएमएस आणि एअरटेल टीव्ही, म्युझिक यांसारखे एअरटेलचे अॅप्सचे सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये दिले जाते. २८ दिवसांची या प्लॅनची वैधता आहे.

Leave a Comment