या कारणांसाठी तरी नक्की कर्नाटकाला भेट द्या


कर्नाटक राज्य देशाच्या पर्यटन नकाशावर फारसे पुढे नसले तरी पर्यटकांना मोहात पाडतील अशी अनेक पर्यटन स्थळे येथे आहेत. या ठिकाणची सैर कधी ना कधी नक्कीच करायला हवी. सध्या मान्सूनचे दिवस जवळ येत आहेत. पाउस थोडा रुळला कि कर्नाटकातील जोग फॉल्सला नक्कीच भेट द्यावी. देशातील हा दोन नंबरचा उंच धबधबा आहे. येथे हा धबधबा चार प्रवाहात कोसळतो. त्यांची नावे राजा, राणी, रोअरर आणि रॉकेट अशी आहेत. शिमोगा आणि कन्नड जिल्ह्याच्या सीमेवरचा हा धबधबा गिरसप्पा म्हणूनही ओळखला जातो.


या धबधब्यात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतात चांदी घेऊन येणारे जहाज उलटले होते आणि त्यातून ४८ टन चांदी परत मिळविण्यात यश आले अशीही कथा सांगितली जाते.


दहाव्या शतकातील हुली मंदिरे सध्या फारश्या चांगल्या स्थितीत नसली तरी ती पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहेत. अशी अनेक मंदिरे येथे असून ती फार सुंदर आहेत.


चन्नापटना येथे बनणारी लाकडी सुबक रंगीबेरंगी खेळणी हे देशाचे वैभव म्हणता येईल. घरे, प्राणी, खेळणी, वधू वर असे अनेक प्रकार येथे लाकडातून बनविले जातात आणि हि परंपरा टिपू सुलतानचा काळापासून प्रसिद्ध आहे. बंगलोर पासून ६० किमीवर हे गाव आहे. तेथे आजही हि खेळणी बनविली जातात आणि मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात.


पूर्वीच्या वैभवशाली विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी येथे आज भग्नावशेष आहेत मात्र तरीही त्या काळाचे वैभव दाखविण्यासाठी ते पुरेसे आहेत. आज हि जागा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात सामील केलेली असून येथील दगडी रथ, मंदिरे आवर्जून पहावीत अशी आहेत.

Leave a Comment