स्वतःच्या खाद्यांवर हेलिकॉप्टर पेलणारा वीर


ह्या मनुष्याला ह्या जगातील आश्चर्यांपैकी एक म्हणता येईल. कोणत्याही सामान्य मनुष्याच्या पेक्षा हा मनुष्य अगदी वेगळा आहे. ह्या मनुष्यामध्ये ‘हल्क’ सारखी ताकद असून अतिशय भारी भरकम वस्तू उचलून पेलण्याची ताकद ह्या मनुष्यामध्ये आहे. चित्रपटामध्ये हल्क ज्या पद्धतीने मोठ-मोठे ट्रक, रणगाडे लीलया उचलून भिरकावून देतो, तशीच काहीशी अद्भुत शक्ती ह्या मनुष्यामध्ये आहे.

असा माणूस अस्तिवात असणे शक्य नाही असे काहींना वाटेल, पण हा माणूस अस्तित्वात आहे. वास्तविक जीवनामध्ये हा माणूस इतका बलशाली आहे, की आपल्या खांद्यांवर एक हेलिकॉप्टर तो लीलया पेलू शकतो. ह्या बलशाली वीराचे नाव आहे फ्रांझ म्युलनर. फ्रांझ ऑस्ट्रिया देशाचे निवासी असून, हेलिकॉप्टर खांद्यांवर उचलून धरण्याचा ह्यांचा विश्वविक्रम आहे. जगामध्ये फ्रांझचा हा विक्रम मोडणारा दुसरा कोणताही इसम अस्तित्वात असणे कठीण आहे.

फ्रांझचे स्वतःचे जितके वजन आहे, या वजनाच्या दीड पट अधिक वजन फ्रांझ आपल्या खांद्यांवर सहज पेलू शकतात. आपल्या खांद्यांवर ६५० किलो वजन उचलून घेऊन फ्रांझने गिनीज विश्वविक्रम केला, तर सबंध हेलिकॉप्टर आपल्या खांद्यांवर तीस सेंकंद पेलून धरण्याचा विश्व विक्रमही फ्रांझ ह्यांच्याच नावे आहे. ह्या पूर्वी देखील अनेक भारी भरकम वस्तू आपल्या खांद्यांवर उचलून घेण्याचे किती तरी विक्रम फ्रांझ ह्यांनी केले आहेत.

Leave a Comment