पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्याला अटक


मुंबई – जुहू पोलीस ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दोघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनिकेत पाटील याला याप्रकरणी अटक करण्यात आली असून, दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले होते. हे वक्तव्य फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आले होते. तक्रारदाराकडून यासंदर्भात आलेल्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अश्लील शिवीगाळ करणे, ठार मारण्याची धमकी देणे, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी आणि माहिती व तंत्रज्ञान कायदयाखाली दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अनिकेत पाटील याला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. लवकरच दुसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात येईल असा विश्वास जुहू पोलिसांनी यावेळी व्यक्त केला आहे.