कान्सच्या रेड कार्पेटवर ब्रायडल गाऊनमध्ये अवतरली सोनम कपूर


सध्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपला जलवा दाखवत असून सोनम येथे लॉरियाल पॅरिस इंडियाचे प्रतिनिधत्व करत आहे आणि ती यासाठी १४ आणि १५ मे ला कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली.

ती लग्नानंतर पहिल्यांदाच रेड कार्पेटवर अवतरत आहे. कान्सच्या पहिल्या दिवशी सोनमने राल्फ अॅँड रुसोचा लेहंगा परिधान केला होता. तर दुसऱ्या दिवशी वेरा वांगच्या २०१९ च्या ब्राईडल कलेक्शनमधील न्यूड गाऊनला पसंती दिली. या गाऊनमध्ये सोनम अत्यंत सुंदर दिसत होती.

सोनमची कान्स फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याची ही ८ वी वेळ होती आणि दरवर्षी सोनमचे स्टायलिंग तिची बहिण रियाच करते. पण ती यावेळी वीरे दी वेडींगच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने सोनमसह कान्समध्ये सहभागी होऊ शकली नाही. सोनम या फेस्टिवलनंतर लवकरच वीरे दी वेडिंग या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि हा चित्रपट १ जूनला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Sonam Kapoor picks a bold, nude gown for her second red carpet appearance at Cannes