कर्नाटक निवडणूक निकालानंतर पेट्रोल-डिझेल महागले!


नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर १५ पैसे, तर डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर २१ पैसे वाढ करण्यात आली आहे. नवे वाढीव दर आज सकाळपासूनच लागू झाले आहेत.

२४ एप्रिलपासून कर्नाटक निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे होते. पण जसे मतदान संपले, तसे १४ मे रोजी दरवाढ करण्यात आली होती. पेट्रोल १४ मे रोजी प्रति लिटर १७ पैसे, तर डिझेल प्रति लिटर २१ पैशांनी महागले होते. दररोज इंधनाचे बदलतात. पण कर्नाटक निवडणुकीदरम्यान या दरांमध्ये बदलच झाले नव्हते. पण मतदान होताच आणि निकाल लागताच, पुन्हा एकदा इंधन दरात चढ-उतार सुरु झाली.

Leave a Comment