फोर्डने सादर केले इकोस्पोर्टचे नवे एडिशन


मुंबई : आपली छोटी एसयूवी कार असलेल्या इकोस्पोर्टच नवे एडिशन फोर्ड इंडियाने लाँच केले आहे. दिल्लीत याची एक्स शो रूम किंमत १०.४ लाख रुपये ते ११.८९ लाख रुपयांपर्यंत असणार आहे. सनरूफ ते लॅस सिग्नेचर अॅडिशनच्या पेट्रोल वेरिएंटची किंमत १०.४० लाख रुपये आणि डिझेल वेरिएंटची किंमत १०.९९ लाख रुपये असणार आहे. एक लीटर इकोबूस्ट इंजिन ते लॅस पेट्रोल वेरिअंटची किंमत ११.३७ लाख रुपये ऐवढी असणार आहे. त्याचबरोबर १.५ लीटर डिझेल इंजिन इकोस्पॉर्ट मॉडेल ११.८९ लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

याबाबत फोर्ड इंडियाचे अध्यक्ष अरूण मेहरोत्राने दिलेल्या माहितीनुसार, फील्स लाइक फॅमिली प्रोमिससोबत ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधिल असणार आहे. कंपनीने या एडिशनमध्ये १.० लीटरला इकोबूस्ट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तर १२३ बीएचपी पॉवर आणि १७० एनएम पीक टॉर्क जनरेट केले आहे. या कारला कंपनीने नव्या अंदाजात सादर केले आहे. फॉगलॅप्ससोबत एचआयडी हँडप्लस कारमध्ये देण्यात आले आहे. यासोबतच कारमध्ये १७ इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आला आहे.

Web Title: New Ford EcoSport gets Sunroof; EcoSport S & Signature Edition Introduced