वीरे दी वेडींगचे आणखी गाणे रिलीज


सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांचा वीरे दी वेडींग चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असून यादरम्यान चित्रपटातील वीरे हे नवे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या चौघी मैत्रिणींचा या गाण्यात मस्तीभरा अंदाज पाहायला मिळत आहे. गाण्याचे संगीत मस्त आहे आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे.

विशाल मिश्रा, आदिती सिंग शर्मा, युलिया वंतूर, धवानी भानुशाली, निकीता आहुजा, पायल देव आणि शारवी यादव यांनी हे गाणे गायले आहे. तर अवनिता दत्तने गाण्याचे बोल लिहिले आहेत. गाणे अत्यंत सुंदरपणे चित्रित करण्यात आले असून यापूर्वी चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत.