कर्नाटकचे राज्यपाल हे भाजपच्याच बाजूने जाणार – राज ठाकरे


रायगड – भाजप, काँग्रेस आणि जेडीएसमध्ये कर्नाटकमध्ये सत्ता स्थापना करण्यासाठी रस्सीखेच सुरु असून यावेळी बाजी नेमकी कोण मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. एकीकडे राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपने वेळ मागितला असताना, कर्नाटकचे राज्यपाल भाजपच्याच बाजूने जाणार असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

भाजपने कर्नाटकमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे सत्ता स्थापन करण्याचा पहिला अधिकार आपलाच असल्याचा दावा केला असला तरी, निवडणुकोत्तर काँग्रेसने जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाशी आघाडी करुन बहुमताचा आकडा गाठल्याने नव्या आघाडीलाच सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली पाहिजे, असा प्रतिदावा केला आहे.

दरम्यान कर्नाटकमधील परिस्थितीवर भाष्य करताना, राज ठाकरे यांनी कर्नाटकचे राज्यपाल हे भाजपच्याच बाजूने जाणार, पण सत्ता आहे म्हणून भाजपने दुरुपयोग करु नये अशी टीका केली आहे. भाजपची सुद्धा वेळ येणार आहे, सत्ता गेल्यावर त्यांचीही चौकशी होणार असंही ते बोलले आहेत.

Web Title: Karnataka Governor goes to BJP side - Raj Thackeray