कठुआ प्रकरणातील आरोपींच्या बचावासाठी हिंदू संघटना गोळा करत आहे निधी


नवी दिल्ली – हिंदू एकता मंचने कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींसाठी निधी गोळा करण्यास सुरुवात केली असून, त्यांच्याकडून लोकांना पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी आरोपींनी केली असून, हिंदू एकता मंचने हे आवाहन त्याच पार्श्वभुमीवर केले आहे. कायदेशीर लढ्यासाठी आरोपींना आर्थिक मदत मिळावी हा त्यामागचा उद्धेश असल्याचे संघटनेने सांगितले आहे.

याबाबत हिंदू एकता मंचचे अध्यक्ष विजय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांना मदतीसाठी आवाहन करण्याचा निर्णय आमच्या संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. पण आम्हाला अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. पुढे बोलताना ते म्हणाले, गरज पडल्यास निधी उभा करण्यासाठी आमच्या मित्र आणि शुभचिंतकांना संपर्क करु असे म्हटले आहे.

सर्वोत्तम लीगल टीम सर्वोच्च न्यायालयात केस लढण्यासाठी असावी यासाठी आमचा प्रयत्न असून त्याकरिता ते शक्य सर्व प्रयत्न करु. सर्वांना आम्ही आवाहन करतो की, त्यांनी पुढे येऊन पैसे उभे करण्यासाठी मदत करावी जेणेकरुन ही मदत आरोपींच्या कायदेशीर लढ्यासाठी वापरता येईल, असे विजय शर्मा यांनी म्हटले आहे.

Web Title: Hindu organizations are collecting funds to save the accused in the Kathua case