वडिलांच्या कारकिर्दीवर लागलेला डाग पुसण्यासाठी काँग्रेससोबत जाणार


बंगळुरू – २००४ आणि २००५ मध्ये मी भाजपसोबत जायचा निर्णय घेतला. पण त्यामुळे माझ्या वडिलांच्या कारकिर्दीवर डाग लागला. मला दोन्ही बाजूची ऑफर आली असून पण आता मला तो डाग पुसण्याची देवाने संधी दिली आहे. म्हणून मी आता काँग्रेससोबत जाणार असल्याचे कुमारस्वामी यांनी बंगळुरु येथील पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल खंडित स्वरुपाचा आल्याने सरकार स्थापनेसाठी घोडेबाजाराला सुरुवात झाली आहे. जेडीएसच्या आमदारांना प्रत्येकी १०० कोटींची ऑफर भाजपकडून देऊ केली असल्याचा आरोपही कुमारस्वामी यांनी केला आहे.

कुमारस्वामी यावेळी म्हणाले, प्रत्येकी १०० कोटींची ऑफर जेडीएसच्या आमदारांना देण्यात आली असून हा काळा पैसा कोठून येत आहे? स्वतःला ते गरिबांचे कैवारी समजतात आणि ते आज आमदार फोडण्यासाठी पैशांची ऑफर देत आहेत. यावेळी आता आयकर खाते कोठे आहे? असाही सवाल उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, की ‘ऑपरेशन कमळ’ यशस्वी होईल हे भाजपने विसरून जावे. आमच्याकडे भाजप सोडून येणारी लोकही आहेत. भाजपने जर आमदार फोडण्याचा प्रयत्न केला, तर आम्हीही तीच पद्धत वापरू आणि त्यांचे दुप्पट आमदार फोडू. राज्यपालांना मी विनंती करतो, की घोडेबाजाराला प्रोत्साहन देईल असा कोणताही निर्णय त्यांनी घेऊ नये. दोन्ही बाजूंनी आपल्याला प्रस्ताव आला होता. मी हे अत्यंत गांभिर्याने सांगत आहे.

Web Title: Going with Congress to wipe out the stigma of his father's career