बदलता येणार २०० आणि २००० च्या नोटा


नागरिक त्यांच्या मळलेल्या, फाटलेल्या २०० रु. आणि २ हजार रुपयांच्या नोटा रिझर्व बँकेच्या कोणत्याची शाखेत तसेच करन्सी चेस्ट असलेल्या कोणत्याची शाखेत बदलून घेऊ शकणार असल्याचा खुलासा केंद्रीय बँकेने केला आहे. रिझर्व बँकेच्या जुन्या, फाटक्या, मळलेल्या नोटा बदलण्याबाबत असलेल्या नियमात २०० आणि २००० रु.नोटांच्या उल्लेख नसल्याने अश्या नोटा नागरिकांना बदलता येणार नाहीत अश्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या संदर्भात काही मार्गदर्शक तत्वे रिझर्व बँकेने तयार केली आहेत.

या गाईडलाईन नुसार नागरिक त्याच्या जवळच्या रंग गेलेल्या, शाई अथवा रंगाचे डाग पडलेल्या, मळलेल्या, फाटलेल्या, जुन्या झालेल्या २०० व २००० च्या नोटा अन्य ५,१०,२०,५०,१००,५०० च्या नोटाप्रमाणे बदलू शकतील. दोन तुकडे झालेल्या नोटा अथवा जळलेल्या नोटही बदलता येणार असून त्यासाठी थोडा वेळ लागेल मात्र खराब झालेल्या सर्व नोटांचे नंबर सुरक्षित असणे आवश्यक आहे असे अधिकारी म्हणाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोट बदल नियम गॅजेट नोटीफिकेशन प्रक्रिया सुरु केली गेली आहे त्याला बऱ्याच परवानग्या घ्याव्या लागतात. ती प्रक्रिया पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल.

Leave a Comment