हे आहे जगातील सर्वात जास्त उंचीवर असलेले ट्री-हाऊस


जगातील सर्वात जास्त उंचीवर असलेले ट्री हाऊस निर्माण करणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे असे, की त्या विवक्षित ठिकाणी ट्री हाऊस बनविण्याचा आदेश त्याला स्वतः सृष्टी रचयिता परमात्म्याने दिला. परमात्म्याचा आदेश झाल्यानंतर त्याने ही अद्भुत रचना केली असल्याचे त्या व्यक्तीचे आहे. ह्या रचने अंतर्गत ह्या व्यक्तीने जगातील सर्वात अधिक उंचीवर असलेले ट्री हाऊस बनविले. हे ट्री हाऊस इतक्या उंचीवर आहे, की त्याच्या सर्वात वरच्या मजल्यावर जाण्याची हिंमत फार कमी लोकांना होते. येथून खाली वाकून पाहण्याची हिंमत कोणाचीच होत नाही.

अमेरिकेतील टेनेसी राज्यातील क्रॉसविल शहरामध्ये जगातील सर्वात अधिक उंचीवर असलेले हे ट्री हाऊस आहे. सहा मोठ्या वृक्षांच्या सहाय्याने हे ट्री हाऊस बनविले गेले आहे. शंभर फुटांच्या उंचीवर असणारे हे ट्री हाऊस दहा मजली इमारतीच्या उंची इतके उंचावर आहे. हे ट्री हाऊस एखाद्या सामान्य मनुष्याच्या मालकीचे घर नसून टेनेसीचे रहिवासी असणाऱ्या एका मंत्री महोदयांचे आहे.

ह्या ट्री हाऊसचे निर्माण करणाऱ्या आर्किटेक्टला हे ट्री हाऊस बनविण्याची कल्पना १९९३ साली सुचली. त्याने त्याची कल्पना सत्यात उतरविण्याकरिता ह्या घराचे निर्माण करण्यास सुरुवात केली खरी, पण हे घर पूर्णत्वाला पोहोचे पर्यंत अकरा वर्षांचा कालावधी उलटून गेला होता. ह्या घराचा विस्तार दहा हजार चौरस फुट इतका प्रचंड आहे. ह्यामध्ये वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘स्पायरल’, म्हणजेच गोलाकार जिने आहेत. ह्या घराच्या प्रत्येक मजल्याला प्रशस्त बाल्कानीज असून ह्या घरामध्ये एक लहान आकाराचे बास्केट बॉल कोर्टही आहे.

ह्या घरामध्ये असलेले पेंट हाऊस ह्या घराची खासियत म्हणता येईल. ह्या घराच्या सजावटीकरिता जुन्या काचेच्या बाटल्यांचा वापर केला गेला आहे. घराचा पाया जितका भक्कम, तितके घरही मजबूत असते. ह्या ट्री हाऊसचा पाया ऐंशी फुट खोलवरपर्यंत आहे. त्यामुळे हे ट्री हाऊस खूप उंचीवर असले, तरी ही ते कोसळण्याचा धोका अतिशय नगण्य आहे. ह्या घराच्या प्रत्येक मजल्याची उंची नऊ ते अकरा फुट आहे.

हे घर बनविण्यासाठी सुमारे बारा हजार डॉलर्स खर्च केले गेले. लायसन्स प्लेट, फर्निचर, घराचे छत बनविण्यासाठी लागलेली सामग्री आणि प्लेक्सीग्लासने बनविलेला ‘स्काय लाईट’ तयार करण्याकरिता हा खर्च आला आहे. ह्या घरातील गोलाकार जिने ह्या घराचे प्रमुख आकर्षण आहेत. बर्जेस नामक व्यक्तीने हे ट्री हाऊस आपल्या पत्नीकरिता बनवून घेतले होते.

Leave a Comment