ओप्पोचा रिअलमी १ भारतात लाँच


ओप्पोचा मेड इन इंडिया स्मार्टफोन रिअलमी १ या नावाने भारतात १५ मे रोजी लाँच होत आहे. विशेष म्हणजे आजकाल स्मार्टफोन उत्पादक ग्राहकांचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी नवनवीन मार्ग चोखाळत आहेत. ओप्पोहि त्याला अपवाद नाही. त्यांनी हा फोन अमेझॉन या ई कॉमर्स साईटच्या मदतीने बाजारात आणला आहे. अमेझॉनने या फोनचे फोटो वेबसाईटवर दिले आहेत.

हा फोन डायमंड बॅक रिअर पॅनल सह दिसत आहे. या फोनला ६.१ इंची फुल एचडी स्क्रीन, ६ जीबी रॅम, १२८ जीबी मेमरी, १३ एमपीचा एलईडी फ्लॅश सह रिअर कॅमेरा, ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा फिंगरप्रिंट सेन्सर सह दिला गेला आहे. अँड्राईड ओरिओ ८.१ ओ एस आणि ३४१० एएमएचची बॅटरी या फोनला दिली गेली आहे. रिअलमी ब्रांड खाली कंपनी १० ते २० हजार या रेंजमधले फोन सादर करणार आहे तर ओप्पो २० हजार च्या पुढचे स्मार्टफोन बाजारात आणणार आहे असे समजते.

Leave a Comment