यंदाची कर्नाटक निवडणूक ठरली सर्वाधिक महागडी


कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी १२ मे ला मतदान झाले आणि आज त्याची मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी प्रचंड पैसा खर्च केला असून हि निवडणूक आत्तापर्यंत झालेल्या राज्याच्या सर्व विधानसभा निवडणुकीत महागडी ठरली असल्याचा अहवाल आला आहे.

सेंटर फॉर मिडिया स्टडिज ने केलेल्या सर्व्हेक्षणात या निवडणुकीत विविध पक्ष आणि उमेदवार यांनी केलेल्या खर्चाचा आकडा ९५०० ते १०,५०० कोटींवर गेला आहे. गेल्या विधानसभेच्यावेळी हा आकडा निम्मा होता. या खर्चात पंतप्रधान अभियानाचा खर्च समाविष्ट नाही असेही स्पष्ट केले गेले आहे. या अहवालात कर्नाटकात केला गेलेला खर्च गेल्या २० वर्षातील सर्वाधिक असल्याचे नमूद केले गेले आहे.

विधानसभा असो कि लोकसभा, आंध्र, तामिळनाडू आणि कर्नाटक नेहमीच खर्चात देशात सर्वात पुढे असतात. या हिशोबाने सध्याच्या खर्चाचा विचार केला तर आगामी लोकसभा निवडणुकीत हा खर्च ५० ते ६० हजार कोटींच्या घरात असेल असा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकचा खर्च ३० हजार कोटी होता असेही समजते. यंदा व्यक्तिगत खर्चात ७५ टक्के वाढ झाल्याचेही दिसून आले आहे.

Leave a Comment