कर्नाटक निवडणुकांनंतर महागले पेट्रोल-डिझेल


नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकांनंतर आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून पेट्रोलचे दर २४ एप्रिल म्हणजे १९ दिवसांनंतर पुन्हा वाढले आहेत. यापूर्वीच कर्नाटकमधील निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मुंबईमध्ये पेट्रोल १७ पैसे तर डिझेल २3 पैसे महाग झाले आहे. पेट्रोलचे भाव दिल्ली, कोलकातासह सर्व शहरांमध्ये वाढले आहेत. कर्नाटकमध्ये १२ मे रोजी मतदान झाल्यानंतर लगेचच इंधन दरवाढ करण्यात आली आहे.

याबाबत इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि मुंबईत सोमवारी पेट्रोलच्या किंमतीत १७ पैशांची वाढ करण्यात आली तर चेन्नईत १८ पैशांची वाढ झाली. नव्या दरवाढीमुळे मुंबईमध्ये पेट्रोलचे दर ८२.६५ रुपये, दिल्लीमध्ये ७४.८० रुपये, कोलकाता ७७.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ७७.६१ रुपये प्रतीलिटर झाले आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांनी गेल्या वर्षी गुजरात निवडणुकांनंतरही तेथे जवळपास १५ दिवस सातत्याने एक ते तीन पैशांची कपात केली होती. पण तेथेही मतदानानंतर दरवाढ झाली होती.

Leave a Comment