सर्वसामान्य जनतेलाही ओळखता येणार बनावट नोटा


रिझर्व बँकेने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नकली नोटा सर्वसामान्य माणसेही ओळखू शकतील असे एक अॅप तयार केले असून त्याच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. या चाचण्या सध्या ९५ टक्के यशस्वी झाल्या असून त्या १०० टक्के यशस्वी झाल्या कि हे अॅप लाँच केले जाणार आहे. या अॅपवर सर्व नोटांच्या सर्व फीचर्स बरोबर सुरक्षा फीचर्स असतील त्यामुळे बनावट नोट ओळखणे सहज शक्य होणार आहे.

आज देशात प्रचंड प्रमाणावर बनावट नोटांचा कारभार सुरु आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वसामान्य जनतेलाही बनावट नोटा ओळखता येणे आवश्यक आहे. बनावट नोटांच्या वाढत्या प्रमाणाची रिझर्व बँकेने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार अँड्राईड आधारित अॅप विकसित केले गेले आहे. यात स्कॅनर असून त्याने नोट स्कॅन केली जाईल. फिचर वाचल्यावर नोट खरी कि बनावट हे कळू शकेल. यात १० रु.पासून २ हजारच्या नोटेपर्यंत सर्व नोटा खऱ्या कि खोट्या हे तपासता येणार आहे असे समजते. सुरक्षेसाठी अॅपचे नाव आणि फीचर्स गुप्त ठेवली गेली असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment