फेसबुकची स्वतःची क्रीप्टो करन्सी येणार


सोशल मिडिया क्षेत्रातील नामवंत कंपनी फेसबुक ब्लॉकचेन बनवून स्वतःची क्रीप्टो करन्सी बनविण्याच्या तयारीत असल्याचे टेक वेबसाईट चेडरने म्हटले आहे. या बातमीत फेसबुक बिटकॉइन प्रमाणे स्वतःचे आभासी चलन तयार करण्याबाबत गंभीर असल्याचे म्हटले आहे. फेसबुकचे आज जगात २ अब्ज युजर आहेत अंती त्यांच्यासाठी फेसबुक आभासी चलनाच्या माध्यमातून पेमेंट सुविधा देणार असल्याचे समजते.

फेसबुक मेसेंजरचे इनचार्ज डेव्हिड मार्क्स यांनी ब्लॉकचेन संदर्भात छोटा ग्रुप बनविल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. ते म्हणले सोशल साईटवर ब्लॉकचेनचा अधिकाधिक फायदा कसा घेता येईल याचा शोध घेतला जात आहे. हे तंत्र फेसबुकला अधिक नफा मिळवून देऊ शकेल याचा आम्हाला विश्वास आहे.

Leave a Comment