अॅपल बँकिंग क्षेत्रात उतरणार


टेक जायंट अॅपल बँकिंग क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत असून प्लास्टिक मनी व्यवसायात उतरतील असे समजते. अॅपलने या संदर्भात गुतंवणूक क्षेत्रातील गोल्डमन सॅक्स बरोबर भागीदारी केली असल्याचेही वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले असून अॅपल आणि आयएनसी गोल्डमन लवकरच क्रेडीट कार्ड लाँच करणार आहेत.

वॉल स्ट्रीटच्या अहवालानुसार अॅपलने त्याच्या पे ब्रांडच्या विकासाची योजना तयार केली आहे. त्यांचे क्रेडीट कार्ड पुढील वर्षात लाँच होईल. तसेच अॅपल बर्कले बरोबरची भागीदारी संपुष्टात आणेल. नवीन आयफोनची विक्री संथ गतीने होत आहे त्यामुळे आता कंपनीने मोबाईल आधारित सेवेवर अधिक जोर देण्याचे ठरविले आहे. अॅपल मोबाईल पेमेंट, स्ट्रीम म्युझिक सब्स्क्रीपशन, अॅप स्टोअर विक्री वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. अॅपल पे प्रत्येक व्यवहारावर कंपनीसाठी महसूल निर्माण करत असले तरी ते अपेक्षेनुसार नाही. यामुळे बँकिंग क्षेत्रात उतरून अॅपल ग्राहकांना त्यांची गॅजेट खरेदी करण्यासाठी कर्ज देईल असे समजते.

Leave a Comment