आता घर बसल्या उघडा स्टेट बँकेत खाते


नवी दिल्ली – ग्राहकांसाठी घर बसल्या खाते उघडता येण्याची योजना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने सुरु करण्यात येणार आहे. आता मार्च २०१९ पर्यंत कमीत कमी रक्कम खात्यावर ठेवून खाते वापरता येण्याची सुविधा वाढविण्यात आली आहे. हे खाते डिजिटल स्वरुपात उघडण्यात येणार असून इस्टा सेव्हींग अकाऊंट बँक डिजिटल खाते घरातूनच उघडण्यासाठी योनो ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. खातेदाराना या ऍपच्या माध्यमातून आपले खाते उघडता येणार आहे. ही योजना काही मर्यादीत कालावधीसाठी असल्याचीही माहिती बँकेकडून देण्यात आली. खातेदाराना कमीत कमी खात्यावर रक्कम ठेवल्यास कोणताही दंड करण्यात येणार नाही, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment