मातृदिनानिमित्त गूगलचे खास डूडल


नवी दिल्ली – गुगलने मातृदिनाचे औचित्य साधून खास डूडल तयार केले असून या डूडलमध्ये डायनासोर आई तिच्या बाळाला योग्य मार्गदर्शन आणि सुरक्षा पुरवत असल्याचे दिसत आहे.

आपल्या मुलांसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या मातांसाठी आजचा दिवस समर्पित केला जातो. परंपरेनुसार मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस पहिल्यांदा अमेरिकेत साजरा करण्यात आला. त्यानंतर जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. अॅना जार्व्हिसने १९०८ मध्ये वेस्ट व्हर्जिनियातील ग्राफटनमधील सेंट अँड्रू मेथोडिस्ट चर्च येथे आपल्या आईचे स्मारक तयार केले. तेव्हापासून मातृदिन हा सुट्टीच्या दिवस साजरा करण्यात येतो. अॅनाच्या मते आपण आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी. कारण, आई ही जगातील एकमेव व्यक्ती आहे, जी तुमच्यासाठी सर्वकाही करते.

Leave a Comment