८००० कमवणारा फ्लिपकार्टचा कर्मचारी झाला करोडपती !


नवी दिल्ली : काही दिवसांआधीच अमेरिकेच्या रिटेल बाजारातली बलाढ्य कंपनी वॉलमार्टने भारतातली ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला विकत घेतले. ही डील तब्बल १ लाख कोटी रुपयांची होती. पण आता तुम्हाला हे वाचून धक्का बसेल पण एकेकाळी 8000 पगारावर काम करणारे अंबर इय्यप्पा या डीलमुळे करोडपती झाले आहेत.

फ्लिपकार्ट कंपनीचे अंबर इय्यप्पा हे पहिले कर्मचारी होते आणि ते आज करोडपती आहेत. २००७मध्ये लॉन्च झाल्यानंतर दोन वर्षांनी फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन व बिनी बंसल यांच्यावर कामाचा ताण येऊ लागला कारण तेव्हा एका दिवसात फ्लिपकार्टवर १०० ऑर्डर येण्यास सुरुवात झाली होती. अशात त्यांना मदतीच्या हाताची गरज होती. त्यावेळेस अंबर यांची नियुक्ती करण्यात आली. ८००० पगारावर फ्लिपकार्टमध्ये अंबर यांची नियुक्ती करण्यात आली. कंपनीसाठी अंबर यांनी खुप मेहनत केली. फ्लिपकार्टच्या ग्राहकांना त्यांच्या येण्याने वेळवर ऑर्डर मिळण्यासाठीही मदत झाली. त्यांच्या या कामावर खुश होऊन पहिल्या महिन्यातच त्यांना ५००० रुपये बोनस देण्यात आला. अजूनही कंपनीमध्ये इय्यप्पा तितक्याच जोमाने काम करीत आहे. ६ लाख रुपये सध्या त्यांचा पगार दरमहा आहे आणि ते कस्टमर एक्सपीयरेंस मॅनेजमेंट डायरेक्टर या पदावर आहेत.

Leave a Comment