३० मे पासून संपावर जाणार देशभरातील दहा लाख बँक कर्मचारी


चेन्नई – वेतनवाढीच्या मागणीसाठी ३० मे पासून देशभरातील बँकांमध्ये कार्यरत असलेले दहा लाख कर्मचारी ४८ तासांच्या संपावर जाणार असल्याची माहिती ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशनने (एआयबीईए) दिली आहे.

३० मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून १ जूनला सकाळी ६ वाजेपर्यंत संपाची घोषणा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सतर्फे (यूएफबीयू) करण्यात आली आहे. लवकर नोव्हेंबर २०१७ पासून थकित असलेली वेतनवाढ करण्याची मागणी फोरमने केली आहे. इंडियन बँक असोसिएशनला (आयबीए) संपाची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती एआयबीईएचे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी दिली.

बँक क्षेत्रातील ९ युनियन्सचे प्रतिनिधीत्व करणारा यूएफबीयू हा मंच आहे. ५ मे रोजी मुंबई येथे यूएफबीयू व आयबीए यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत वेतनवाढीविषयी बोलणी निष्फळ ठरल्यानंतर संपाचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Comment