झाड कापताना घडला भलताच प्रकार..!


ऑस्ट्रेलिया मध्ये घडलेली ही अजब घटना झपाट्याने सर्वतोमुखी होत आहे. ही घटना नेमकी काय आहे हे माहित झाल्यावर लोकांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. इथे असे झाड सापडले आहे ज्यामधून सतत धूर निघत आहे. लोकांनी हा धूर झाडाच्या आसपास पेटलेल्या विस्तवातून येत आहे असे वाटून सर्व परिसर पालथा घातला. पण विस्तव कुठेच पेटला नसल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर हा धूर झाडाच्या आतमधून येत असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. हा प्रकार कसा काय घडत असावा ह्याचे हे तेव्हा कोणालाच समजले नाही.

ऑस्ट्रेलियातील न्यू जर्सी भागामध्ये सापडलेल्या ह्या झाडामधून हिरव्या रंगाचा धूर निघत आहे. हा हिरवा धूर झाडाच्या आतमधून निघत आहे हे पाहिल्यावर लोकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. काहींनी तर हा काहीतरी ईश्वरी संकेत असल्याचे मत व्यक्त केले. पण तरी ही ह्यामागचे नेमके रहस्य तेव्हा उलगडले नाही. ह्याबद्दल पूर्ण हकीकत अशी, की हँडर्सन मिल्विले नामक एक इसम पाईन वृक्षांची कापणी करीत होता. जेसीबीच्या मदतीने जेव्हा त्यांनी एक मोठा वृक्ष तोडविला, तेव्हा त्या झाडामधून अचानक हिरव्या रंगाचा धूर निघू लागला. हे दृश्य पाहून मिल्विले स्तिमित झाले. हा प्रकार कसा काय घडला हे त्यांना समजेना.

ह्या घटनेबद्दल जेव्हा कम्बरलँड काउंटी शेरीफशी चर्चा केली गेली, तेव्हा त्यांनी, हा कोणत्याही प्रकारचा चमत्कार नसून अश्या घटना वारंवार घडत असल्याचे सांगितले. झाडामध्ये परागकण सर्वात जास्त असताना जर त्या झाडाची कापणी झाली, तर अश्या प्रकारचा हिरवा धूर झाडातून येत असल्याचे शेरीफचे म्हणणे आहे. त्यांच्या मते ही घटना अतिशय सामान्य असून, त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये असा संदेश देखील शेरीफने नागरिकांना दिला आहे. पण त्याचबरोबर नागरिकांना सावध राहण्याचा संदेश देत, ह्या धुराच्या आसपास जास्त वेळ राहिल्यास डोळे खाजू लागतात, त्यामुळे धुराच्या आसपास जाताना सावधगिरी बाळगण्यास सांगितले जात आहे.