मुक्तीक्षेत्र, नेपाळ मधील महत्वाचे प्राचीन तीर्थस्थळ


नेपाळ मधील मुक्तीक्षेत्र हे चार प्रमुख मुक्तीधामातील एक मानले जाते. हे अतिप्राचीन क्षेत्र असून पुराणात त्याचे उल्लेख येतात. पुराणानुसार पृथ्वीचे सप्त पुरी आणि चार क्षेत्रे याचे वर्णन आहे. त्यात मुक्तीक्षेत्राचा उल्लेख येतो. नेपाळातील शाळीग्राम पर्वत आणि दामोदर कुंड याच्या मध्ये असलेल्या या ठिकाणी ब्रह्मदेवाने यज्ञ केला होता. त्याच्या प्रभावाने शिव ज्वालारुपात तर नारायण जलरुपात उत्पन्न झाले. वैदिक काळापासून या क्षेत्राच्या पूजा अर्चनाचे वर्णन केले गेले असून त्यानुसार ती अविरत सुरु आहे.


उपनिषदे, ब्रह्मसूत्र, स्कंद, वरः, ब्रह्म अश्या सर्व पुराणात या ठिकाणच्या पूजाविधीचे वर्णन केले गेले आहे. स्वामी नारायण यांनी येथे ६ महिने तपस्या करून सिद्धी प्राप्त केल्या असा समज आहे. हिंदूंसाठी हे पवित्र स्थळ आहेच पण बौद्ध धर्मीयांचीही या स्थळावर अपार श्रद्धा आहे. ते बुद्धाचा अवतार अवलोकितेश्वर मानून याची पूजा येथे करतात.

या स्थळाचा बद्रीनाथाशी संबंध लावला जातो कारण बद्रीनाथ धाम येथे शालीग्रमाची पूजा केली जाते. येथे गंडकी नदी आणि दामोदर कुंड प्रवाह याचा संगम असून त्याला काकवेणी असे म्हणतात. येथे श्राध्द, तर्पण केले जाते. त्यामुळे २१ पिढ्याना मुक्ती मिळते अशी भावना आहे. भागवत पुराणात कलियुगात ५ हजार वर्षे पूर्ण झाली कि गंगा स्वर्गात परत जाणार असा उल्लेख आहे त्याचबरोबर गंगा गेली तरी गंडकी नदी १० हजार वर्षे राहणार आणि भाविकांना मुक्ती देणार असे सांगितले जाते.

Leave a Comment