फ्लिपकार्ट वॉलमार्ट डील मध्ये आयकरविभाग मालामाल


वॉलमार्टने भारतीय ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे विक्रमी किमतीला खरेदी केल्याचा सर्वाधिक फायदा भारतीय आयकर विभागाला होणार असे दिसत आहे. या डीलमध्ये कराचा पेच निर्माण झाला असून आयकर विभागाने दोन्ही कंपन्यांना कर भरण्याचे आदेश दिले असल्याचे समजते. नियमानुसार हा कार भरावा असे आयकर विभागाचे म्हणणे आहे.

आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार वॉलमार्टने फ्लिपकार्ट ला पैसे देताना कराची रक्कम बाजूला काढून फ्लिपकार्टच्या भागधारकांना पैसे द्यावेत तर फ्लिपकार्टला आयकर विभागाने संपूर्ण डीलचा तपशील देण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीचे शेअर ट्रान्स्फर झाल्यामुळे कर भरावा लागणार आहे कारण फ्लिपकार्ट हि भारतातली मालमत्ता आहे. आयकर नियम विभाग ९ प्रमाणे विदेशी कंपनीने खरेदी केलेली मालमत्ता भारतात असल्याने त्यांना १० ते २० टक्के कर भरावा लागणार आहे. त्याला विदहोल्डिंग कर असे म्हणतात. त्याचबरोबर फ्लिपकार्टचे मालक सचिन बन्सल यानाही २० टक्के कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागणार आहे. सॉफ्ट बँकेला २२ टक्के स्टॉक विलय कर भरावा लागेल कारण या व्यवहारात सॉफट बँकेला १३ हजार कोटी फायदा होणार असल्याने त्यांना २ हजार कोटी रुपये करापोटी द्यावे लागतील.

Leave a Comment