झुरळे या उपद्रवी किटकाविषयी बरेच काही


घरात, दारात कुठेही झुरळ दिसले कि पहिली प्रतिक्रिया भीती आणि किळस अशीच होते. झुरळे यांच्याविषयी आपण अधिक माहिती घेण्यास फारसे उत्सुक नसतोच. पण झुरळाविषयी हि माहिती असणे अनेक दृष्टीने महत्वाचे ठरू शकते. जगात झुरळाच्या ४ हजाराहून अधिक जाती आहेत. अमेरिकेत ६ इंच लांबीचे झुरळ सापडले होते मात्र सर्वसाधारण झुरळे १ ते दीड इंच लांबीची असतात.

डोके तुटले तरी हा कीटक ९ दिवस जिवंत राहू शकतो कारण झुरळे अंगावर असलेल्या छिद्रातून श्वास घेतात. अन्नावाचून झुरळ १ महिना जिवंत राहू शकते मात्र पाण्यावाचून एक आठवडा ते जिवंत राहते. झुरळाचे पाय तुटले तरी त्याला नवीन पाय येतात. झुरळ ताशी ३ किमी वेगाने धावू शकते.

झुरळाला मद्य आवडते, त्यातही बिअर त्याला अधिक आवडते. झुरळ ४० मिनिटांपर्यटन श्वास रोखू शकते. बहुतेक झुरळाना पंख असतात पण ते उडू शकत नाही. उंचावरून पडताना या पंखांचा उपयोग तोल सांभाळण्यासाठी होतो. झुरळ मादी एकदाच गाभण होते मात्र जन्मभर ती गाभण राहते. लहान मुलांमधील अस्थमा अॅलर्जी झुरळामुळे होते.

झुरळ दिनक, साबण, कागद, ग्रीस, भिंतीचे गिलावे अगदी केसही खातात. झुरळे नेहमीच टोळीने राहतात. त्यामुळे घरात एक झुरळ दिसले तर नक्की समजायचे कि आणखी झुरळे घरात लपली आहेत. बहुतेक जणांना झुरळाची किळस येते मात्र चीन मध्ये तळलेली झुरळे लोक आवडीने खातात. तेथे झुरळाची अनेक प्रकारची लोणची घातली जातात.