लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचे वॉलमार्ट-फ्लिपकार्ट व्यवहाराने वाटोळे होईल – सीपीआयएम


नवी दिल्ली – फ्लिपकार्टचे ७७ टक्के समभाग अमेरिकेच्या वॉलमार्ट या कंपनीने विकत घेतल्याने भारतातील लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर त्याचा विपरित परिणाम होईल, असे मत भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (सीपीआय-एम) व्यक्त केले आहे.

गुरुवारी सीपीआयच्या पॉलिट ब्युरोने काढलेल्या आपल्या निवेदनात हा व्यवहार प्रतिबंधित करावा अशी मागणी केली आहे. यामध्ये म्हटले आहे, की आपली उत्पादने वॉलमार्ट आंतरराष्ट्रीय बाजारातून घेते. ती उत्पादने आता भारताच्या बाजारपेठेत देखील विकली जातील. त्यामुळे भारतातील लहान आणि मध्यम उद्योग क्षेत्र उद्ध्वस्त होईल. ही क्षेत्रे शेतीनंतर सर्वात अधिक रोजगार पुरवणारी क्षेत्रे आहेत.

वॉलमार्टने बुधवारी भारतीय ई-व्यापार कंपनी फ्लिपकार्टचे ७७ टक्के समभाग घेतल्याचे जाहिर केले. सीपीआयने यावर म्हटले आहे, की हा व्यवहार म्हणजे विदेशी भांडवलाचा भारताचा कोट्यावधींच्या किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रावर वर्चस्व मिळवण्यासाठीचा मागच्या दारातून केलेला प्रवेश आहे.

Leave a Comment