महिलांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजेन वाढले असल्याची लक्षणे


एखाद्या गोष्टीचे आपल्या शरीरातील प्रमाण वाढले, की पुढे मागे त्याचे लहान मोठे दुष्परिणाम दिसून येण्यास सुरुवात होते. महिलांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढले, की हमखास वजन वाढू लागते. किंबहुना ज्या महिलांचे वजन अचानक वाढू लागले असेल, त्यांच्या शरीरामध्ये बहुतेकवेळी इस्ट्रोजेनचे पातळी वाढली असल्याचे दिसून येते. इस्ट्रोजेन हा हार्मोन्सचा गट असून त्यामध्ये एस्ट्राडीओल, एस्ट्रीओल, आणि एस्ट्रोन हे तीन हार्मोन्स असतात. मुली वयात येत असताना ह्या हार्मोनची पातळी वाढलेली पाहायला मिळते. ह्या वेळी मुलींच्या शरीरामध्ये अनेक बदल घडून असतात. ह्या वेळी वाढलेले वजन हे देखील इस्ट्रोजेनच्या वाढत्या पातळीमुळे असू शकते.

आपल्या शरीरातील फॅट टिश्यू अतिरिक्त इस्ट्रोजेन तयार करीत असतो. हे इस्ट्रोजेन पोटाच्या आसपास तयार होत असल्याने पोटाचा घेर वाढू लागतो. तसेच जेव्हा महिला गर्भवती असते, तेव्हाही तिच्या शरीरामध्ये इस्ट्रोजेन अधिक प्रमाणात सक्रीय असते. तसेच मासिक धर्माच्या वेळी ही प्रोजेस्टेरोन हार्मोन सक्रीय असल्यामुळे महिलांचे स्तन अधिक संवेदनशील होऊन त्यामध्ये सूज येणे किंवा वेदना होणे अशी लक्षणे दिसून येतात. पण गर्भवती नसताना, किवा मासिक धर्म सुरु नसतानाही स्तन संवेदनशील असतील, त्यांमध्ये वेदना होत असतील, तर ही इस्ट्रोजेनची पातळी वाढली असल्याचे लक्षण आहे. तसेच यामुळे स्तनांमध्ये गाठी जाणविण्याची शक्यता असते.

इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढले, की थायरॉईडीझम सम लक्षणे शरीरामध्ये दिसून येऊ लागतात. ह्याचे कारण हे की इस्ट्रोजेन वाढले की थायरॉईड बाइंडिंग ग्लोब्युलीनमध्ये ही वाढ होते. त्यामुळे टी ३ आणि टी ४ ह्या हार्मोन्सची पातळी कमी होते. त्यामुळे हायपर थायरॉईडीझम प्रमाणे लक्षणे दिसून येतात. शरीरामध्ये इस्ट्रोजेनची पातळी वाढली की मासिक धर्मामध्ये अनियमितता वाढते. मासिक धर्म वारंवार, थोड्याच दिवसांच्या अंतराने येऊ लागतो, किंवा सलग काही महिने येतच नाही. हार्मोन्स असंतुलित असल्याने वजन वाढू लागते. इस्ट्रोजेनचे पातळी वाढलेली असली, की महिलेची मनस्थिती क्षणा-क्षणाला बदलते. क्षणांत आनंदी, तर क्षणात उदास अशी काहीशी त्यांची मनस्थिती असते. विशेषतः ज्या महिला मेनोपॉझ अनुभवित असतील, किंवा ज्या महिला गर्भवती असतील त्याच्या बाबतीत हे लक्षण अधिक दिसून येते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment