स्टेशनवरील ‘फ्री’ वायफाय वापरुन ‘केपीएसी’त हमालाची बाजी


एर्नाकुलम – रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सामानाचा डोलारा पेलणारा कुली के.श्रीनाथने आपल्या बौध्दिक क्षमतेचा परिचय करून देत राज्यसेवा आयोग अर्थात केपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. त्याने यासाठी रेल्वे स्थानकातील मोफत वायफायचा आधार घेतला.

के.श्रीनाथ केरळच्या एर्नाकुलम स्थानकात हमाल असून तो नित्यनियमाने प्रवाशांच्या सामानाचा भार हलका करण्याचे काम करतो. पण त्याने आपल्या डोक्यावर असलेल्या परिस्थितीचा भार हलका करण्यासाठी सरकारी नोकरीत जाण्याचे जे स्वप्न पाहिले आणि ते त्याने जिद्दीच्या जोरावर पूर्णही केले.

केरळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची श्रीनाथ तयारी करत असे. त्याने त्यासाठी रेल्वे स्थानकावर उपलब्ध असलेल्या मोफत वायफाय सुविधेचा लाभ घेतला. श्रीनाथने कामाच्या व्यतिरीक्त मिळणाऱ्या वेळेत मोफत वायफायचा वापर करून अभ्यास केला. व्हिडिओच्या माध्यमातून विविध समजावून घेणे तसेच संदर्भ पुस्तके, प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून त्यांचा अभ्यास तो करायचा. त्याने उपलब्ध वेळ आणि तंत्रज्ञानाची अचूक सांगड घालत यशाचे शिखर सर केले.खर तर रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय सुविधा उपलब्ध आहे. त्याचा वापर करून आपल्या आयुष्यात परिवर्तन आणणारा श्रीनाथचा आदर्श तरूणांनी घ्यायला हवा.

Leave a Comment