राम जानकीचे विवाहस्थळ जनकपुर


पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ व १२ मे रोजी नेपाल दौऱ्यावर जात असून तेथे ते सर्वप्रथम जनकपुर ला भेट देत आहेत. येथील जानकी मंदिरात मोदी रामसीतेचे दर्शन घेऊन पूजा करणार आहेत. त्याची जोरदार तयारी केली गेली आहे.

हे जनकपुर म्हणजे प्रभू श्रीराम व सीता याचे विवाहस्थळ मानले जाते. रामायणात त्याचे उल्लेख सापडतात. त्यानुसार जनकपुर हे मिथिला नगरीचे शासन केंद्र होते. अतिशय सुंदर असे हे ठिकाण पर्यटकांचे आवडते स्थळ आहेच पण भारत नेपाळ सह जगात जेथे हिंदू आहेत तेही आवर्जून या स्थळाला भेट देण्यासाठी येतात. त्यांच्यासाठी हे पवित्र तीर्थस्थळ आहे.


नेपाळमधील हे सर्वात जुने प्राचीन मंदिर मानले जाते. ४८६० चौ. फुट परिसरात असलेले हे मंदिर पांढऱ्याशुभ्र दगडात बांधले गेले असून ४ थ्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. मंदिराला मुघल कोईरी स्टाईल चे घुमट असून वास्तुशैली हिंदू आणि कोईरी आहे. बांधकामात रंगीत काचा वापरल्या गेल्या आहेत तसेच कोरीव काम आणि पेंटिंग्ज चितारली गेली आहेत. सीतेची स्वयंवर येथे झाले होते असे मानले जाते.

या मंदिरातच विवाह मंडप आहे. तेथे राम सीतेचा विवाह झाला असे सांगतात. या मंदिराचे बांधकाम टिकमगडच्या राणी वृषभानू यांनी केले असेही संदर्भ सापडतात. हे बांधकाम १९१० साली झाल्याचे सांगतात. त्यावेळी त्यासाठी ९ लाख रु. खर्च केले गेले होते म्हणून या मंदिराला नवलाख मंदिर असेही म्हटले जाते.

१६५७ साली या जागी सीतेची सोन्याची प्रतिमा मिळाली होती. सीता येथे राहत असे आणि जनकराजा येथेच शिवधनुष्याची पूजा करत असे. एप्रिल २०१५ च्या भूकंपात या मंदिराची थोडी पडझड झाली होती. रामनवमी, विवाह पंचमी अश्या दिवशी येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते.

Leave a Comment