गरिबीतून आलेला डेव्हिड ली बनला फेरारीचा संग्राहक


असे म्हणतात कि कुणीच कुणाचे नशीब पाहू शकत नाही. आज दारिद्र्यात राहणारा माणूस नशिबाची साथ असेल तर पैशात लोळू शकतो. याचे जिवंत उदाहरण आहे चीनमध्ये राहणारा डेव्हिड ली. एके काळी खाण्याचे वांधे असलेला डेव्हिड आज जगात फेरारी संग्राहक म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या संग्रही फेरारी सह अनेक महागड्या गाड्या आहेत. त्याच्याकडे असलेल्या कार्सची एकूण किंमत आहे ३३० कोटी रुपये.

डेव्हिड १३ वर्षाचा होता तेव्हा त्याच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. कुटुंबाला एकवेळचे अन्न मिळणे मुश्कील होते. याचवेळी त्याच्या वडिलांना भेटलेल्या एका व्यक्तीने ज्युवेलरी व्यवसायात काम दिले आणि वडिलांसोबत डेव्हिडही या व्यवसायात उतरला. अफाट कष्टाचे फळ हळूहळू दिसू लागले आणि डेव्हिडची परिस्थिती सुधारू लागली. डेव्हिडने लहानपणापासून पैसे जमले कि फेरारी कार घ्यायचे स्वप्न पाहिले होते. डेव्हिडचा व्यवसाय भरभराटीला आला आणि त्याने अमेरिकेत ज्युवेलरी स्टोर्स सुरु केले. वयाच्या २४ व्या वर्षी त्याने पहिली फेरारी घेतली. यातून त्याला कार कलेक्शनचा छंद लागला आणि आता त्याच्या संग्रही अनेक फेरारी आहेत. चीन, अमेरिकेत डेव्हिडचा हा संग्रह प्रसिद्ध आहे आणि त्याला फेरारी कलेक्टर म्हणून ओळखले जाते.

त्याच्या संग्रही फेरारी लुसो २५० आहे. जगात या मॉडेलच्या फक्त ४ कार आहेत. १९९७ चे २८८ जीटीओ मॉडेलहि त्याच्याकडे आहे. या मॉडेलच्या फक्त ७ कार बनविल्या गेल्या होत्या. त्याच्याकडे फेरारीची सर्वात जुनी एफ ५० कारही आहे.

Leave a Comment