रोल्स रॉईसची कलिनन एसयूव्ही सादर


दीर्घ काळ प्रतीक्षा असलेली रोल्स रॉईसची जगातील पहिली एसयुव्ही कलिनन नावाने सादर केली गेली असून या एसयूव्हीसाठी ग्राहकाला ४ लाख डॉलर्स मोजावे लागतील असे समजते. कंपनीचे अध्यक्ष आणि बीएमडब्ल्यू ग्रुप बोर्डचे सदस्य पीटर श्वार्जनेबर यांनी ही नवी एसयुव्ही ग्राहकांसाठी उत्तम पर्फोर्मन्सचे नवे स्टँडर्ड ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

या एसयुव्हीला ६.७५ लिटरचे व्ही १२ इंजिन दिले गेले असून ती ऑल व्हील ड्राईव्ह आहे, तिची चारी चाके स्टीअरिंग व्हीलशी कनेक्ट करता येतात. आठ स्पीड ऑटो ट्रान्समीशन आहे. कारला लग्झरी केबिन असून मागच्या भागात ऑटोमेटिक सिस्टीमने मागचा भाग उघडला जातो आणि १ बटण दाबताच २ प्रवासी बसू शकतील आणि सामान ठेऊ शकतील अशी सोय होते. भारतात ही एसयूव्ही २०१९ मध्ये येईल. या कारवर ४ वर्षे काम सुरु होते आणि दुर्गम भागातील रस्त्यांवर तिच्या अनेक चाचण्या घेतल्या गेल्या आहेत.

कलिनन या नावाचा हिरा असून तो जगातील सर्वात मोठा हिरा मनाला जातो. आफ्रिकेच्या खाणीत तो सापडला होता. या एस्युव्हीला कस्टमाइज ऑप्शन दिले गेले आहे. तिचा टॉप स्पीड इलेक्ट्रोनिकली लिमिटेड असून तो २५० किमी प्रती तास असा आहे.

Leave a Comment