जिओची भन्नाट ऑफर, ५० पैशात विदेशात कॉल


रिलायंस जिओने प्रीपेड प्लानने देशात क्रांती घडविल्यानंतर आता पोस्टपेड साठीही भन्नाट प्लान सादर केला आहे. त्यानुसार देशविदेशात सर्वात कमी दरात कॉल सुविधा दिली जात आहे. या नव्या प्लानची घोषणा गुरुवारी केली गेली असून त्याची सुरवात १५ मे पासून होणार आहे. प्रीपेड प्रमाणेच हि नवी योजना क्रांती घडवेल आणि पुन्हा एकदा टेलिकॉम कंपन्यात दर युद्ध सुरु होईल आणि पर्यायाने त्याचा थेट फायदा ग्राहकाला मिळेल असे जाणकार सांगत आहेत.

या नव्या योजनेनुसार जिओ युजरला आंतरराष्ट्रीय कॉलिंग, रोमिंग आकर्षक दरात उपलब्ध करून देणार आहे. परदेशात प्रती मिनिट ५० पैसे दराने कॉल करता येईलच पण देशात प्रथमच पोस्टपेड प्लानमध्ये झिरो टच सेवा, व्हॉइस कॉलिंग प्रीअॅक्टीव्हेटेड सह मिळणार आहे. हि सेवा कधीच बंद होणार नाही.

अनलिमिटेड इंडिया प्लानसाठी दरमहा १९९ रु. आंतरराष्ट्रीय कॉलिंग साठी प्रती मिनिट ५० पैसे असे दर लावले जात असून त्यासाठी कोणत्याही अटी नाहीत तसेच सेवा शुल्क नाही. युजर त्याचा नंबर न बदलता जिओ नंबर घेऊ शकणार आहे. सीम अॅक्टीव्हेष्ण, होम डिलिव्हरी, ईकेवायसी आदि प्रक्रिया ५ मिनिटात पूर्ण केल्या जाणार आहेत असेही समजते.

Leave a Comment