उन्हाळ्यातला आदर्श आहार


तापमान जसे वाढत जाते तसे भूक मंदावते आणि सतत काही काही ना काही पेय प्यावे असे वाटायला लागते. आपण सतत पाणीच पीत रहातो. या दिवसात केवळ पाणी प्याल्याने अन्न कमी जाते आणि त्यातून अशक्तता यायला लागते. त्यावर उपाय म्हणून लोक आइस्क्रिम खायला लागतात किंवा चमचमीत पदाथार्र्ंवर ताव मारायला लागतात. हिवाळ्यात केलेल्या डायटचा बोर्‍या वाजतो आणि वजन वाढण्याची भीती असते. तेव्हा उन्हाळ्याचा प्रश्‍नही सुटावा आणि वजन कमी करण्याचा सिलसिलाही चालू रहावा यासाठी आहार तज्ञांनी उन्हाळ्यात काही विशिष्ट आहार घेण्याचा आग्रह धरलेला असतो. त्यात प्रामुख्याने काही भाज्या आणि काही फळांवर त्यांचा भर असतो. हा आहार वजन नियंत्रणात तर ठेवतोच पण खाल्लेले अन्नाचे पचन होण्यासही उपयुक्त ठरतो.

या आहारात तज्ञांनी पायनॅपलवर भर दिलेला आहे. हे फळ प्रामुख्याने कोकणात आणि केरळात पिकत असले तरी त्याचे मार्केटिंग छान झाले असल्याने ते देशाच्या सगळ्या भागात उपलब्ध होत आहे. त्यात ब्रोमेलीन हे एन्झाईम असते. ज्याचा उपयोग अन्नाच्या पचनास होतो. सुटलेले पोट कमी करण्यासही पायनॅपल कामाला येते. कारल्याचा महिमा फार मोठा आहे. कारण ते कडू असते. आयुर्वेदात लोकांना सगळ्या प्रकारच्या चवीचे अन्न खाण्याचा सल्ला दिलेला असतो. कारण शरीराला सगळ्या चवींची गरज असते. कारले कडू असले तरीही त्याचा कडूपणा शरीराला उपयुक्त ठरतो. कारले खाल्ल्याने पचन शक्ती तर सुधारतेच पण रक्त शर्करा कमी होते. तेव्हा मधुमेहींनी अधुन मधुन कारल्याची भाजी खाल्ली पाहिजे.

कारले आणि टरबूज हे उन्हाळ्यातले हंगामी पदार्थ आहेत. तेव्हा या दिवसांत टरबूजही खाणे गरजेचे आहे. टरबुजात ९२ टक्के पाणी असते त्यामुळे त्यात पोषण द्रव्ये कमी असतील असे वाटते पण त्यात अनेक पोषक तत्त्वे असतात आणि ते पातळ असल्याने त्यात उष्मांकही कमी असतात. टरबूज खाणे वजन कमी करण्यासाठी आवश्यक असते. उन्हाळ्यातले सर्वात छान रॉ फूड म्हणजे टोमॅटो. टोमॅटोत रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता असतेेेे. ते स्वस्तही असते. त्याच बरोबर काकडी, सीमला मिरची, द्राक्षे यांचेही सेवन उन्हाळ्यात केले पाहिजे. कारण काकडीने आपल्या शरीरातला पाण्याचा अंश वाढतो. उन्हाळ्यात त्याची गरज असतेे. ढोबळी मिरची, काकडी, कोबी, टमाटो यांची कोशींबीर खाणे या दिवसात मानवते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment