वॉलमार्टच्या खरेदीमुळे फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्याना लागली लॉटरी


नवी दिल्ली: फ्लिपकार्ट कंपनी खरेदी करत वॉलमार्टने भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल टाकले आहे. फ्लिपकार्टचे कर्मचारी वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टमधील या व्यवहारामुळे मालामाल झाले आहेत. २२ अब्ज डॉलर मोजून वॉलमार्टने फ्लिपकार्ट कंपनी खरेदी केल्यामुळे फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपत्तीत मोठी वाढ होणार आहे. ही भारतीय कंपन्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ ठरली आहे. एम्प्लॉयी स्टॉक ओनरशिप प्लानमधील (ईसॉप्स) संपत्तीचे मूल्य दोन कंपन्यांमध्ये झालेल्या व्यवहारामुळे २ अब्ज डॉलरवर जाऊन पोहोचले आहे. फ्लिपकार्टच्या आजी-माजी १०० कर्मचाऱ्यांकडे ईसॉप्स असून फ्लिपकार्ट खरेदी केल्यामुळे ईसॉप्सच्या किमतीत मोठी वाढ झालीय.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईसॉप्ससाठी वॉलमार्ट १०० टक्के बायबॅक ऑफर आणणार असल्यामुळे कंपनीचे समभाग असलेल्या कर्मचाऱ्याला एका समभागामागे १५० डॉलर म्हणजेच १० हजार रुपये मिळतील. पण कर्मचाऱ्याला समभाग विकायचे की नाहीत, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल. यामुळे कंपनीचे अनेक आजी-माजी कर्मचारी कोट्यधीश होतील. फोनपे सीईओ आणि संस्थापक समीर निगम, फ्लिपकार्टच्या तंत्रज्ञान विभागाचे माजी प्रमुख अधिकारी आमोद मालवीय, वेबफॉर्म उडानच्या ऑपरेशन्स विभागाचे माजी अध्यक्ष सुजीत कुमार यांचा यामध्ये समावेश आहे.

Leave a Comment