थेट गौतम अदानी यांनाच रामदेवबाबांच्या पतंजलीचे आव्हान


पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे करीबी मानले जाणारे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांना रामदेवबाबांच्या पतंजली आयुर्वेदने आव्हान दिले असून अदानी यांनी बोली लावलेल्या रुची सोया या दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीसाठी पतंजलीने ४ हजार कोटींची बोली लावली आहे. हि आत्तापर्यंतची सर्वाधिक बोली असल्याचे समजते.

रामदेवबाबांच्या पतंजलीने देश विदेशातील अनेक नामवंत कंपन्यांना जेरीस आणले आहे. गौतम अदानी ५५ हजार कोटींची उलाढाल असलेल्या समूहाचे मालक आहेत. त्यांची विल्मार कंपनी खाद्यतेल व्यवसायाशी संबंधित असून त्यांना रुची सोया कंपनीत रस आहे. अदानी याच्या विल्मारचे फोर्च्युन तेल हा देशातील सर्वाधिक विकला जाणारा ब्रांड आहे. पतंजली अनेक उत्पादनाबरोबर खाद्य तेले विकते. त्यांच्या पूर्वीपासूनच रुची सोया बरोबर टायअप आहे. पतंजलीच्या तेलाचे रीफायनिंग आणि पॅकिंग साठी रुची सोया मदत करते. रुचीला १२ हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे ती दिवाळखोर जाहीर झाली आहे.

रामदेवबाबांनी रुची सोया खरेदी करण्यामागे व्यवसाय वाढ याचबरोबर शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्याचा पतंजलीचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. या स्पर्धेत गोदरेज, इमामी या कंपन्याही आहेत.

Leave a Comment