केवळ एक रुपयात खरेदी केलेल्या जमिनीवर आता उभे आहे रेल्वे स्टेशन!


महाराष्ट्रातील एका प्रमुख शहरातील रेल्वे स्थानक जिथे आज उभे आहे, ती जमीन कधी काळी केवळ एक रुपया किंमतीत खरेदी केली गेली होती ही गोष्ट आजच्या काळामध्ये अविश्वसनीय वाटते, नाही का? पण आज ह्या जमिनीवर उभे असलेले हे रल्वे स्थानक अतिशय व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. तसेच ह्या रेल्वे स्थानकाच्या मार्फत रेल्वे प्रशासनाला आजच्या काळामध्ये लाखो रुपयांची कमाई होत असते.

ह्या रेल्वे स्थानकाच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले, तर खैरागढच्या राजाने ही जमीन ब्रिटीश सरकारला केवळ एक रुपया किंमतीमध्ये विकली. ह्याच जमिनीची किंमत आता कोट्यवधी रुपयांची आहे. ह्या जमिनीवर बनलेले रेल्वे स्थानक आहे, नागपूर रेल्वे स्थानक. ह्या रेल्वे स्थानकाची स्थापना १५ जानेवारी १९२५ रोजी, तत्कालीन गव्हर्नर सर फ्रँक ह्यांच्या हस्ते करण्यात आली होती. मध्य रेल्वे नागपूर मंडलच्या ह्या रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे निर्माण सावनेरहून आणविलेल्या ‘बलुआ’ नामक दगडांनी केले गेले आहे. अश्या प्रकारच्या इमारती भारतामध्ये काही ठिकाणीच पाहायला मिळतात.

आजच्या काळामध्ये नागपूर महानगर बनले असल्याने येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड वर्दळ पाहायला मिळते. ह्या स्टेशनवरून दररोज ९२ एक्स्प्रेस आणि २०० मालगाड्यांचे आवागमन सुरु असते. ह्या रेल्वे स्थानकावर आठ प्लॅटफॉर्म्स असून, ह्या स्थानकावर संगणकीकृत आरक्षण प्रणाली, अनारक्षित तिकीट प्रणाली, वातानुकुलित प्रतीक्षालय, विश्रामगृह, एस्केलेटर, बेस किचन अश्या प्रकारच्या सर्व अद्ययावत सोयी आहेत.

Leave a Comment