मारुती सुझुकीने परत मागवल्या स्विफ्ट, बलेनोच्या तब्बल ५२ हजार कार


मुंबई: मारुती सुझुकी कंपनीने स्विफ्ट आणि बलेनो कार परत मागवल्या असून कंपनीने तांत्रिक बिघाडामुळे थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल ५२ हजार ६८६ गाड्या परत मागवल्या आहेत. १ डिसेंबर २०१७ ते १६ मार्च २०१८ या दरम्यान या सर्व कार बनवल्या आहेत. कंपनीकडे यापैकी काही कारमध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. कंपनीने वाढत्या तक्रारीमुळे तब्बल ५२ हजार ६८६ गाड्या परत मागवल्या आहेत.

ज्या गाड्यांमध्ये बिघाड झाला आहे, त्यांच्यासाठी एक कॅम्पेन सुरु करण्यात येईल. त्यानुसार तो बिघाड दुरुस्त केला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. ज्यांनी ज्यांनी या गाड्या खरेदी केल्या आहेत, त्या ग्राहकांशी कंपनी १४ मे पासून संपर्क साधणार आहे. जो बिघाड कारमध्ये असेल तो दुरुस्त करण्यासाठी अनेक कंपन्यांकडून अशाप्रकारचे कॅम्पेन सुरु केले जातात. यामध्ये गाडीचा बिघाड मोफत दुरुस्त केला जातो. ग्राहकांकडून एकही पैसा घेतला जात नाही.

Leave a Comment